Type Here to Get Search Results !

'आर्थिक क्षमता' शासनाकडे ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर केलेल्याच ठेकेदारांच्याच निविदा पात्र करा

'आर्थिक क्षमता' शासनाकडे ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर केलेल्याच ठेकेदारांच्याच निविदा पात्र करा
▪️... अन्यथा प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल 
▪️ जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे-पाटील यांचा इशारा



 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा प्रक्रिये अंतर्गत ठेकेदारातर्फे निविदा सादर करताना निविदा भरण्याची क्षमता अर्थात 'बीड कॅपॅसिटी' संदर्भात माहिती शासनाकडे सादर करणे अनिवार्य असल्याचा शासन निर्णय ७ डिसेंबर २०२३ झाला असून ज्या ठेकेदारांनी ऑनलाइन प्रणाली द्वारे 'निविदा भरण्याची क्षमता' शासनाला सादर केली आहे अशाच ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत पात्र करावे, ज्या ठेकेदारांनी आर्थिक क्षमता अर्थात निविदा भरण्याची क्षमता शासनाकडे सादर केली नाही अशा ठेकेदारांना अपात्र करावे अशी मागणी जनशक्तीचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली असून यामध्ये काही गैरव्यवहार झाल्यास याच्या सखोल चौकशीची मागणी करून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांसह इतरांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की,
▪️ कव्हे लहू म्हैसगाव ते राष्ट्रीय महामार्ग 145 ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 16 मध्ये सुधारणा करणे.
▪️रोपळे केम वडशिवणे ते कंदर ते कनेरगाव प्रमुख जिल्हा मार्ग 18 किमी मध्ये सुधारणा करणे.
▪️कुर्डू ते चौथे पिंपरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 121 किलोमीटर मध्ये सुधारणा करणे.
▪️जिल्हा हद्द ते दिंडोरे तांदुळवाडी सुलतानपूर जागगरू रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 121 किलोमीटर मध्ये सुधारणा करणे.
▪️अकोले खुर्द कन्हेरगाव निमगाव ढवळस चौथे पिंपरी कव्हे प्रमुख जिल्हा मार्ग 121 किलोमीटर मध्ये सुधारणा करणे.
▪️निमगाव उपळवटे रस्ता राष्ट्रीय महामार्ग ९ किलोमीटर मध्ये सुधारणा करणे, व १/१४५ मध्ये पुलाचे बांधकाम करणे.
▪️माळेगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग रस्ता ग्रामा 151 किलोमीटर मध्ये सुधारणा करणे.
▪️टेंभुर्णी बेंबळे परिते वरवडे कोळे भेंडचिंचोली माढा प्रमुख जिल्हा मार्ग मध्ये सुधारणा करणे.
▪️ सोलंकरवाडी ते राष्ट्रीय महामार्ग 9 इजिमा 116 किलोमीटर मध्ये सुधारणा करणे.
▪️दहिवली निमगाव पिंपळनेर उजनी होळी खुर्द भेंडारण तुळशी ते प्रमुख राष्ट्रीय मार्ग आठ ला जोडणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 105 मध्ये सुधारणा करणे.
▪️दहिवली निमगाव पिंपळनेर उजणी गोळे भेंड अरण तुळशी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 105 किलोमीटर मध्ये सुधारणा करणे.
▪️चिंकहिल ढवळे वडशिंगे ते दरफळ रस्ता इजीमा 14 मध्ये सुधारणा करणे 1 ते 5 किमी 
▪️चिंकहिल ढवळे वडशिंगे ते दरफळ रस्ता इजीमा 14 मध्ये सुधारणा करणे 5 ते 12 किमी 

याशिवाय असे अनेक कामे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्या नोटीसी मध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन बीड कॅपॅसिटी अर्थात निविदा भरण्याची प्रक्रियेत मालमत्तेसह ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक आहे.
 तरीही आपली माहिती लपवून ठेवत शासनाची फसवणूक करण्याच्या हेतूने अनेक ठेकेदारांनी आपली आर्थिक क्षमता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे शासनाकडे पुरविली नाही. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी बीड कॅपॅसिटी सिद्ध केली नाही, अशा सर्वच ठेकेदारांना या प्रक्रियेतून बाद करावे अशी मागणी करून त्यांनी या निविदा प्रक्रियेत काही गैरव्यवहार झाल्यास अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करून न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.


▪️यासंदर्भात बांधकाम विभाग क्र.2 कार्यकारी अभियंता एच. चौगुले यांना निवेदन देताना जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे-पाटील यांच्यासह कार्यकर्ते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad