गंगाखेड- गंगाखेड तालुका वकिल संघाच्या अध्यक्षपदी ॲड.विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड झाली.दि.२८ फेब्रुवारी रोजी न्यायालयातील वकिल संघाच्या कक्षामध्ये २०२४ -२०२५ या वर्षासाठी वकिल संघाची बैठक संपन्न झाली.यात अध्यक्ष म्हणून ॲड.विवेक निळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
गत वर्षीच्या वकिल संघाचा कार्यकाळ संपल्याने बुधवार रोजी नविन वर्षाची कार्यकारणी निवडण्यात आली.वकिल संघाचे अध्यक्ष म्हणून ॲड.विवेक निळेकर यांची निवड झाली.उपाध्यक्ष म्हणून ॲड.सय्यद सादीक, सचिवपदावर ॲड.लक्ष्मण केंद्रे, सहसचिव म्हणून सय्यद मुस्तकीन मुजीब, कोषाध्यक्ष पदावर ॲड.सत्यभामा पारवे, यांची एकमताने निवड करण्यात आली.नविन वकिल संघाच्या कार्यकारणीचा वकिलाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नुतन अध्यक्ष विवेक निळेकर सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करतांना म्हणाले, की वकिल संघाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली.अध्यक्ष या नात्याने मी वकिल संघाची यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडणार आहे.वकिल संघाचे समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.