आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून १२५ वैज्ञानिक प्रकल्प अपूर्व विज्ञान मेळाव्यात सादर केल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली .
अपुर्व विज्ञान मेळाव्यात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेले १२५ नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले ज्यामध्ये
सूर्यमाला, घनता , दाब, विद्युतधारा , पवनचक्की ,भूकंप संकेत यंत्रणा, जलशुद्धीकरण यंत्र , ठिबकसिंचन ,गवत कापणी यंत्र , रॉकेट बनविणे , स्मार्ट होम इत्यादी प्रयोग सादर केले.
विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन माणिक हुले व सहकारी शिक्षकांनी फीत कापून केले . विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन प्रयोगांची कृती व वैज्ञानिक संकल्पना समजावून घेतल्या . या प्रदर्शनास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन विज्ञान प्रकल्पांची माहिती घेतली .
विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन वैशाली काळे, संजय वळसे , वंदना मंडलिक , लक्ष्मी वाघ , वैभव गायकवाड , राधिका शेटे , संतोष पिंगळे , सुभाष साबळे , लक्ष्मण फलके व गुलाब बांगर यांनी केले.
प्रतिनिधी आकाश भालेराव घोडेगाव