आंबेगाव वसाहत - घोडेगाव
दिनांक 22/2/2024
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचा शुभचिंतन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंटरनॅशनल सायन्स ऑल्मपियाड स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलेल्या रेहान अरिफ पानसरे , अर्थव दिलीप भवारी, शिवप्रसाद विठठ्ल मोरे , आर्या पिंटू करे, सिद्धी संदीप लोहकरे, दिक्षा विनायक घोडेकर , अनुष्का किशोर खासदार तसेच इनरव्हील क्लब आयोजित सरताज गीत गायन स्पर्धेतील निल रविंद्र खरात , सोहम विनायक घोडेकर आदर्श विद्यार्थी व ईश्वरी विठठ्ल मोरे आदर्श विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सरपंच प्रमिलाताई घोलप व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रमिला घोलप ,प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण काळे मा . मुख्याध्यापक लालबहादूर शास्त्री विद्यालय अमोंडी , विजय हगवणे मा . मुख्याध्यापक जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल चिंचोली , उपसरपंच परविन पानसरे , ग्रामपंचायत सदस्य विजय घोलप , मिलिंद भांगरे, पुनम घोलप , खंडू खंडागळे उपस्थित होते .
प्रमुख पाहुणे विजय हगवणे माजी मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेस सामोरे जाताना अगदी आत्मविश्वासाने सामोरे जावे तसेच जीवनात ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे वाटचाल करावी . लक्ष्मण काळे सर यांनी आई ,वडिल आणि शिक्षक यांचा आदर करावा व स्त्री शक्ती चा सन्मान सर्वांनी करावा असे आव्हान सर्व विद्यार्थ्यांना या प्रसंगी केले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल , विविध राबवलेल्या उपक्रमांची आणि विविध चौदा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा आढावा घेऊन सर्व स्पर्धा परीक्षार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
कार्यक्रमाचे नियोजन माणिक हुले , संजय वळसे , वैशाली काळे, वंदना मंडलिक, लक्ष्मी वाघ,वैभव गायकवाड , गौरी विसावे, राधिका शेटे , संतोष पिंगळे, सुभाष साबळे , गुलाब बांगर ,लक्ष्मण फलके यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी ईश्वरी मोरे व ईश्वरी काळे यांनी केले व आभार तनुजा समवंशी हिने मानले .
प्रतिनिधी आकाश भालेराव
घोडेगाव