Type Here to Get Search Results !

शेती शेतीच्या आधुनिकीकरणासाठी कृषी कन्यांनी दिली इ-नाम ॲप विषयी माहिती


शेती शेतीच्या आधुनिकीकरणासाठी कृषी कन्यांनी दिली इ-नाम ॲप विषयी माहिती
प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड 
 आधुनिकतेच्या काळात शेतकऱ्यांना शेती करताना मोबाईलवर सहज व सोप्या भाषेत समजेल अशी सर्व माहिती मिळवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या ऋतुजा महारनवर , प्रतिक्षा देशमुख ,गीता जाधव, प्रियंका नवले, कोमल मोहिते ,श्रद्धा पोळ ,अतिया काझी, ज्ञानेश्वरी शिंदे, प्रेरणा माने-देशमुख ,श्वेता जाधव यांनी भंडीशेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
 शेतकऱ्यांना मोबाईल ॲपचा फायदा व्हावा यादृष्टीकोनातून ॲप मार्फत मदत केली जाते. इ -नाम ,किसान ॲग्री ॲप, कृषी नेटवर्क , किसान योजना, ऍग्रो मार्केट, फॉर्म बी यांसारख्या अनेक ॲपद्वारे हवामान आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पीक लागवड पद्धती ,खते व कीटकनाशके यांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. 
 यावेळी भंडीशेगाव येथील प्रगतीशील शेतकरी अक्षय यलमार ,विजय यलमार, मधुकर यलमार ,संजय रणखांबे ,मारुती गिड्डे ,विठ्ठल विभुते इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad