माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. यामुळे प्रदेश काँग्रेसने आमदारांना व्हीप बजावला आहे. काँग्रेसची बैठक विधान भवनात होणार आहे.
दरम्यान, या बैठकीला 43 पैकी 33 जण उपस्थित राहिले आहेत तर कारण न देता 10 आमदार गैरहजर राहिले आहेत.