छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी
91 INDIA NEWS NETWORKसोमवार, फेब्रुवारी १९, २०२४
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने बाल शिवव्याख्याती कुमारी अनुष्का सतीशराव जाधव हिचे शिवव्याख्यान ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच अश्विनीताई तिटकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्री. सोमनाथभाऊ काळे ग्रामपंचायत सदस्य श्री. स्वप्निल घोडेकर सौ. सारिकाताई घोडेकर, संगीताताई भागवत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हेमंतभाऊ काळे उपाध्यक्ष प्रमोद जी आर्वीकर, मुख्याध्यापक अलका चासकर, शिक्षक श्री. राजाराम काथेर सुनिता काठे, पूनम सोमवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी शिवरायांचा पाळणा या गीतावरती नेत्र दीपक नृत्य केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवरायांवरती आपले विचार व्यक्त केले. माननीय सोमनाथ भाऊ काळे यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुजनांचे ऐकावे व शिवरायांप्रमाणे मोठे व्हावे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. प्रमोद आर्वीकर यांनी आपण शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगण्याचा कानमंत्र दिला. ग्रामपंचायत घोडेगाव व शालेय व्यवस्थापन समिती घोडेगाव यांच्या वतीने शिवव्याख्याते कुमारी अनुष्का जाधव हिचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत घोडेगावच्या वतीने विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाराम काथेर व आभार श्री. हेमंत काळे यांनी मांडले.