मनोज जरांगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनोज जरांगेंवर जहरी टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे ते आता काहीही बडबड करायला लागले आहेत. त्यांना मी मराठ्यांचा नेता मानत नाही. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असे नारायण राणे म्हणाले.