Type Here to Get Search Results !

भविष्यात हटकर समाज स्वतंत्र आरक्षण मागुन शकतो - भिमराव भुसनर पाटील


भविष्यात हटकर समाज स्वतंत्र आरक्षण मागुन शकतो - भिमराव भुसनर पाटील 

महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा वर राजकारण चालू असुन काही जण तर आरक्षणा बद्दल चुकीचे मेसेज पाठवुन दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.जर हटकर समाजा बद्दल चुकीचे मेसेज पाठवत असतील यर
आरक्षण कोणालाचं मिळणार नाही.महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी आरक्षणा साठी आंदोलन, मोर्चा, उपोषणं, झाली त्यात प्रथम हटकर समाजातील युवा पिढीतील तरूण सगळ्यांत पुढे असतात हे बहुतेक काही जणांना माहित नसावे त्यामुळे आपण मेसेज पाठवुन दोन समाजाचा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.जसा धनगर समाज आहे तसाच हटकर समाज आहे. आजपर्यंतचं रेकॉर्ड धनगर आणि हटकर एका भावाप्रमाणे वागतात.काही विघ्नसंतोष्टी माणसं समाजाचा समाजामध्ये चुकीचे वातावरण तयार करत आहेत. धनगर, हटकर समाजातील विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी यावर स्पष्टीकरण देणं गरजेचे आहे.सरकारी योजना मध्ये सुद्धा हे धनगर समाजालाच योजना मिळणार म्हणून खोटं बोलुन वातावरण तयार केले जाते.हटकर समाज बांधवांनी चुकीच्या अफवांना बळी पडू नका जर जातीनिहाय सर्वे झाला तर आपण हटकर आहोत याची नोंद घ्यावी जर आता तुम्ही हटकर ऐवजी धनगर सांगितले तर भविष्यात तुम्हाला खूप मोठे नुकसान होऊ शकते तुमचे आजोबा, पणजोबा हटकर होते तर तुम्ही धनगर कसे याचे पुरावे देण्यात तुमचे आणि तुमच्या मुलांचे आयुष्य जाईल आणि शेवटी तुम्ही हटकर आहात हेच सिद्ध होईल त्यामुळे यदा कदाचित सर्वे झाला तर हटकरच आहोत हेच सांगायचे हे लोक तुम्हाला फक्त त्यांच्या मतलबा साठी असे करा तसे करा सांगत आहेत पण जेव्हा तुमच्यावर अडचण येईल तेव्हा यातील एकपण येणार नाही त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि आम्ही हटकरच आहोत असे ठाम पणे सांगा.
याबाबत आपण लवकरच हटकर समाज महासंघाचे प्रदेश कोअर कमिटीचा संचालक मंडळ व प्रदेश अध्यक्ष मा राज हटकर पाटील साहेब व सर्व जिल्हा अध्यक्ष,तालुकाध्यक्ष,व इतर पदाधिकारी बरोबर घेऊन समाजातील जेष्ठ नेते मंडळी च्या उपस्थित मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटुन सविस्तर माहिती सांगुन हटकर ही स्वतंत्र जमात असुन ती धनगर प्रवर्गात समाविष्ट आहे. धनगर व तत्सम जमातीना आरक्षणाची अमलबजावणी लवकरात लवकर करावी म्हणून निवेदन देऊन हटकर समाजाच्या हितासाठी विविध विषयांवर चर्चा करणार आहे असे मत हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad