Type Here to Get Search Results !

आंबेगाव | यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये यशवंत कला महोत्सव साजरा



 आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी संयुक्तपणे 'यशवंत सांस्कृतिक महोत्सवा' चे आयोजन केले होते.




सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन प्रकाशराव घोलप मा . सभापती व सरपंच प्रमिला घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.




या प्रसंगी उपसरपंच परविन पानसरे ग्रामपंचायत सदस्य पुनम घोलप , मिलिंद भांगरे , विजय घोलप , युवराज तारडे , अनिता विरणक विमल काठे , राजू पानसरे उपस्थित होते .




       या सांस्कृतिक महोत्सवात 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राची लोकधारा हा बहारदार कला अविष्कार व नृत्य अविष्कार सादर केला . 




प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते , विविध प्रांतांच्या लोककला , लावणी नृत्य , कोळीगीते , भजन, भारुड यामधून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.

 गणपती आराधना , युगे युगे विटेवरी, माझ्या देवाक काळजी रे , लल्लाटी भंडार, गणा धाव रे,नटरंग उभा, वासुदेव गीत, आम्ही ठाकरं ठाकरं, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, बाईपण भारी देवा बाई पण भारी रे , फिर भी दिल है हिंदूस्थानी या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य अविष्कार सादर केले. 'बंड्याच पोट दुखतय ' ह्या नाटकाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली . 

 यशवंत कला महोत्सवाचे नि रेयोजन मुख्याध्यापिका शर्मिला कोकणे , माणिक हुले,वैशाली काळे, लक्ष्मी वाघ,संजय वळसे,वैभव गायकवाड,गौरी विसावे, राधिका शेटे , जयश्री मिडगे , मिनाक्षी रायबोले , पुनम डोके , संतोष पिंगळे ,सुभाष साबळे,गुलाब बांगर,लक्ष्मण फलके यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभाग प्रमुख वंदना मंडलिक यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अविनाश ठाकुर यांनी सर्वांचे आभार मानले.


आंबेगाव प्रतिनिधी आकाश भालेराव 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad