15-20 दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार- गिरीश महाजन
लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. राज्यातील राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे.
भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने राज्यातील विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर येत्या 15 ते 20 दिवसात मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील. आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय घडतय, असे महाजन म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात येऊ शकतात, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे.