मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरायला हवे होते. आरक्षण देण्यास विलंब का झाला, असा सवाल त्यांनी विचारायला हवा होता. मात्र त्याऐवजी ते विरोधात बोलत आहे. राज्य सरकारने जरांगेंच्या मोर्चाविरोधात बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जरांगेंनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केलं. मनोज जरांगे यांच्या सभेला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नागरीकही का जातात? अर वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. त्यांच्या याच वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी अजित पावर यांच्यावर निशाणा साधलाय. "अजित पवार यांनी आमच्यात फूट पडायचं ठरवलं आहे काय? आम्ही भाऊ-भाऊ आहोत आणि आम्ही येणारच. तुमची जी भावना आहे ती त्यांची नाही. त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण भेटावं, तुम्ही याच्यासाठी बाहेर पडले काय? एवढे दिवस तर मराठा आंदोलनावर