Type Here to Get Search Results !

अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त मनसे चा अनोखा उपक्रम


अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त मनसे चा अनोखा उपक्रम

अयोध्या येथे उद्या दिनांक २२-१-२०२४ रोजी प्रभू श्री राम मंदिरात प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे, प्रत्येक हिंदू करिता हा अतिशय आनंदाचा व अविस्मरणीय क्षण असणार आहे तो देश भर मोठ्या उत्साहात पार पडत असताना, यवतमाळ शहरातील गोर गरीब जनता या क्षणा पासून दूर राहू नये, कष्टकारी लोकांसाठी सुद्धा हा क्षण तेवढाच अविस्मरणीय व्हावा या हेतूने २२१२४ दिव्यांच्या वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला. 


या उपक्रमात ५ पणत्या , वाताचे पाकीट, माचिस, तेलाची बॉटल व मिठाई असा संग्रह भेट म्हणुन शहरातील कष्टकरी जनतेस या निमित्ताने उपहार म्हणुन भेट देण्यात आला जेणे करून उद्याची दिवाळी त्यांना सुद्धा साजरी करणे सोईचे होईल. या प्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ येंबडवार , जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार , जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार , सादिक अब्दुल रहेमान , यवतमाळ शहर अध्यक्ष अमित बदनोरे , शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे , अभिजित नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना , शहर उपाध्यक्ष ऋषिकेश हळदे, सोनू गुप्ता प्रथमेश पाटील , आकाश भोयर , श्रावण गायकवाड , साईराम कवडे , दर्शन नानवरे , यांच्यासह यवतमाळ शहरातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्तीत होते


प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad