श्री रामनामाच्या गजराने दुमदुमले अवघे आगाशिवनगर
मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने हनुमान मंदिरात महाआरती व प्रसाद वाटप. दी.22 जानेवारी रोजी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठान सोहळा आगाशिवनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तेथील हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा व महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.
यामधे प्रमुख मान्यवर नंदकुमार बागल, राहुल यादव, बापू जंत्रे, सूरज शेवाळे, अजित सांडगे ,अण्णा माळी ,संदीप मुठ्ठल ,पंकज शेवाळे ,विकास यादव ,मधुकर शेलार,बाळासाहेब सातपुते (मामा), विश्वास चौगुले यांन सारखे प्रमुखांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले त्यावेळी भाविकांतून झालेल्या श्रीराम गजराने आगाशिवनगर परिसर दुमदुमले प्रसंगी आयोजित आरेवाडी येथील भजन व कीर्तन कार्यक्रमाला महिलांचा व भाविकांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला हनुमान मंदिर परिसरात अयोध्या येथील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचे स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले तसेच सायंकाळी श्री राम यांच्या प्रतिमेची परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली सदर सोहळा पार पाडण्यासाठी परिसरातील सर्व गणेश व नवरात्र उस्तव मंडळातील राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले...