अखेर हिंदुत्वाचा-लोकशाहीचा विजय मुख्यमंत्री
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार पात्रता प्रकरणावर आज निकाल दिला.
निकालानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते.
पक्षप्रमुखाला मनमानीपणे निर्णय घेता येत नाही. पक्ष कोणाची खासगी मालमत्ता नाही. पक्षातील घराणेशाही मोडीत निघाली.
हा सत्याचा, लोकशाहीचा, हिंदुत्वाचा विजय आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.