Type Here to Get Search Results !

भिवंडी लोकसभेसाठी भरत पाटील इच्छुक ! पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार !



भिवंडी लोकसभेसाठी भरत पाटील इच्छुक ! पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार !

मुरबाड ( शंकर करडे)2024 ची लोकसभेची निवडणूक जस जसी जवळ यत आहे तस तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवार चाचपणी सुरु केली असुन, देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भा ज पा मधे अनेक पुढारी तिकिटासाठी फिल्डींग लावित आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभेसाठी विद्यमान खासदार तथा मंत्री कपिल पाटील यांच्यासह भा. ज. पा.तील एक शांत, संयमी व जणमाणसात चांगली प्रतिमा असलेले पक्षात भरत पाटील लोकसभेसाठी इच्छूक आहेत. गेली बारा वर्ष ते पक्षाचे एकनिष्ठ काम करत आहेत. 2013ते 2015 या कालावधीत भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राहिले आहेत,2015 पासून भा. ज. प. कार्यकारणी सदस्य होते आता देखील पक्ष्याने दखल घेऊन त्यांची भा. ज. प. कार्यकारणी सदस्य म्हणून फेर निवड केली आली . भरत पाटील यांची जनमानसात चांगली ओळख असून आगामी भिवंडी लोकसभे करिता पक्षाने संधी दिल्यास खासदारकी लढविण्याची तयारी दर्शविली आहे.2014 मध्ये सुद्धा मी इच्छुक होतो व आताही इच्छुक आहे. मी भारतीय जनता पार्टीचा बूथलेवलवर काम करणारा कार्यकर्ता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना आम्ही गांव खेड्यात पोहचवल्या आहेत."मी पैसा नाही तर, माणसे कमाविली आहेत, पक्षाने यावेळी मला संधी दिल्यास मी नक्की सोनं करेन असा विश्वास भरत पाटील यांनी वक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad