Type Here to Get Search Results !

राज्यातील पहिली ग्रामपंचायत सरपंच मानधनातुन केली सरपंच योजना सुरू.

                                
देवडे ता.पंढरपुर जि. सोलापुर  या ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांच्या मानधनातुन सरपंच योजना पहिला हप्ता वाटप करण्यात आला. छोट्या गावामध्ये २२००ते २५०० लोकसंखेच्या गावामध्ये अनोखा उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे, सरपंच मानधन २२५० असताना गावातील गरिब व गरजु महिलांना कामाला जाता येत नाही अशा महिलांना प्रती महिना ५०० सुरू केले.


१)सौ.बायडाबाई गाजरे,२)श्रीमतु इंद्राबाई झांबरे,३)श्रीमती कांताबाई काळे ४)सौ.केराबाई मोरे या चार महिलांना प्रतेकी ५०० प्रमाणे पहिला हप्ता सरपंच सौ.प्रमिला झांबरे यांनी  वाटप केला. या योजनेचे कार्ड तयार केले असुन त्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये येऊन प्रत्येक महिण्याला आपला हप्ता घेऊन जायाचे आहे असे सरपंच यांनी सांगितले.


आशा गावातील निर्धार महिलांना आधार व मदत देण्याचे काम ग्रामपंचायत करत आहे, तालुक्यात नाही तर जिल्हा व राज्यभर या योजनेची चर्चा चालु असुन राज्यातील इतर ग्रामपंचायत व सरपंच यांनी असे योजना व उपक्रम घेतले पाहिजे असे सरपंच प्रतीनिधी मा.सोमनाथ झांबरे यांनी सांगितले, यावेळी सरपंच सौ प्रमिला झांबरे,प्रमुख पाहुणे.लिंगडे सर, अध्यक्ष सौ.पुजा भोई ,उपसरपंच,गणेश शिंदे,सदस्य चांगदेव पाटील, सदस्य हिमंत कडलासकर, सदस्य मोहन मोरे ,सदस्य विजय झांबरे,सदस्य विलास शिंदे,नारायन शिंदे ,परमेश्वर झांबरे,पोलीस पाटील विलास पाटील,तलाठी प्रकाश भिंगारे,ग्रामसेवक शेणवे,सरपंच प्रतिनिधी सोमनाथ झांबरे, यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad