Type Here to Get Search Results !

साखर कारखानदारीत उडाली खळबळ, श्री विठ्ठल च्या संचालकांवर गुन्हा दाखल


साखर कारखानदारीत उडाली खळबळ, श्री विठ्ठल च्या संचालकांवर गुन्हा दाखल

 शेतकर्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अनेक कारणांनी गाजत असून कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर बँकेचे 189 कोटी रुपयाचे कर्ज हप्ते न भरल्या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 420 आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रासह पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
विठ्ठल कारखान्याचे 31 12 2023 अखेर पर्यंत मुद्दल आणि व्याजासह 430 कोटी रुपये कर्ज आहे गळीत हंगाम 2022 23 आणि 23 24 मध्ये उत्पादित केलेल्या साखर आणि इतर व पदार्थ पासून मिळालेले उत्पन्न पैकी बँकेचे धोरण आणि अटी शर्तीनुसार बँक कर्ज खाती 189 कोटी रुपये कर्ज भरणे असताना सदर रकमेचा सो व्यवहारात वापर करून विश्वासघात केला आहे तसेच बँकेची फसवणूक केली आहे म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर 420 सारखा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad