Type Here to Get Search Results !

बाभुळगाव तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू,ठानेदारांचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष,


बाभुळगाव तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरू ठानेदारांचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष

 कमी खर्चात जास्त व भक्कम पैसा कमावण्यासाठी तालुक्या सह शहरातील युवा पिठी अवैध धंद्यात उतरली असल्याने तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे,, बाभुळगाव शहरातच नव्हे तर तालुक्यात वरली मटका, दारु,जुगार, गुटका तस्करी,जनावर तस्करी, अवैध रेती उपसा व वाहतूक वाढली असुन अवैध धंद्यांना जनु नाहरकत दिली की काय असा प्रश्न उपस्थित केला जाते


 बाभुळगाव शहरात जागोजागी मटका काऊंटर,शिवाजी चौकात खुले आम अवैध दारु विक्री,शहरात जुगार अड्डा, गांजा,धंदे जोमात सुरू आहे ,शहरात मागील वर्षी मोठा गुटखा साठा पकडला होता, त्या गुटखा तस्करांने सुद्धा पुन्हा पाय पसरले, सकाळी च राणी अमरावती फाटा, महम्मद पुर फाटा येथे गुटखा घेऊन येणार्‍या वाहणाची हेराफेरी होऊन माल आणल्या जाते


 वर्धा हिंगणघाट,या ठिकानावरुण सकाळी व रात्री जनावरे तस्करी केली जाते,तर तालुक्यातील वर्धा व बेंबळा नदी वरुण सुसाट अवैध रेती उत्खनन व भर दिवसा वाहतूक केली जाते,एका ट्रॅक्टर मागे पंधरा हजार व ट्रक मागे विस हजार रुपये खाकींना द्यावे लागते असे नाव न सांगण्याच्या अटीवर रेती तस्कर सांगतात,वाटखेड वरुन दिवसभर ते रात्री जवळपास 60 वाहणे धावतात,मात्र या सर्वच धंदया कडे येथील ठानेदारांचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष होत असल्याने आता पोलिस अधीक्षक यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे,,,,


 सर्व ठानेदारांना आपल्या कार्य क्षेत्रात अवैध धंदे नाही यासाठी हमी पत्र लिहून देण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत मात्र येथील ठानेदार सुनील हुड यांच्या कार्यक्षेत्रात खुले आम अवैध धंदे सुरू असुन त्या हमी पत्राचे काय असा प्रश्न पडला आहे.

प्रतिनिधि करामत अली बाभूळगाव.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad