Type Here to Get Search Results !

जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या अधिकारी व टोल माफियांवर करवाई करा



जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या अधिकारी व टोल माफियांवर करवाई करा - मागणी मनसेची
आरोप - नियमबाह्य टोल वसुलीला बांधकाम विभागाचे पाठबळ 
वणी / प्रतिनिधी


        शासकीय नियमांना तिलांजली देत मनमानी टोल वसुली करणाऱ्या आय.व्ही.आर.सी.एल कंपनीवर कारवाई करुन चालू असेलेली टोल वसुली तात्काळ थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

     या निवेदनात चंद्रपूर-घुग्गूस-करंजी हा रस्ता तयार करण्याचे काम आय.व्ही. आर. सी. एल कंपनीला देण्यात आले होते. सदर रस्ता तयार झाल्या नंतर कालदोष मर्याद पर्यंत या संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे त्याच बरोबर हा रस्ता स्वच्छ ठेवण्याचे काम संबधित कंपनीचे आहे. वणी आणि परिसरात कोळसा, रेती आणि मातीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या वाहतुकीमुळे उडणारी धूळ प्रवाशांच्या डोळ्यात जात आहे. संपूर्ण रस्ता बांरवार स्वच्छ केला तर हा प्रकार थांबेल. सदर रस्त्याची दुरवस्था झाल्यास त्याची पुनर्निर्मिती करण्याचे काम कंपनीचे आहे. मात्र सद्यस्थितीत रस्त्याच्या मधोमध मोठ मोठ्या भेगा पडल्या आहे यासर्व प्रकारामुळे अनेक अपघात होत आहे. या मार्गावर अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात पोहचविण्याचे काम हि संबधित कंपनीचे असते मात्र सदर कंपनीची एक ही रुग्णवाहिका या रस्त्यावर कार्यरत नाही. परिणामी अनेक कंपनी पूर्णपणे जबाबदार असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

कंपनी कडून प्रवाशांकरिता स्वच्छता गृहाची व्यवस्था सुद्धा नाही. रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले नाही. या सर्व सुविधा नसताना देखील सुद्धा कंपनीच्या सर्व टोलनाक्यावर प्रवाशांकडून दिवसाकाठी लाखो रुपयांची टोल वसूली केली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर कामाच्या करारात असलेले सर्व नियम आणि अटीची पूर्तता न करता हे कंपनी आपल्या मनमर्जीने आपले काम संथ गतीने करत आहे. यातून प्रवाशांना मोठा मानसिक त्रास होत आहे.

त्यामुळे ह्या सर्व कामात आपण स्वतः लक्ष घालून नियम आणि अटींना तिलांजली देत काम करणाऱ्या कंपनी विरोधात कारवाई करून ही टोल वसुली तात्काळ थांबावावी असे या निवेदनात म्हटले आहे. येत्या ८ दिवसात आमच्या मागणी प्रमाणे कारवाई न झाल्यास ही टोल वसुली मनसे स्टाईलने बंद पाडू व या सर्व प्रकाराला आर्थिक देवाण घेवाणीतून पाठबळ आहे असे गृहीत धरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून सार्वजनिक बांधकामाच्या वणी येथील उपविभागीय अभियंत्याला देण्यात आला.

    प्रसंगी विलन बोदाडकर, रंजीत बोंडे, गोवर्धन पिंपळकर, अविनाश जूनघरी, खुशाल काकडे, निकेश आत्राम कुणाल डोंगे, दिपक डोंगे, प्रविण मांडवकर, सुरज काकडे, प्रकाश ढवस, विजय चोखारे, कुणाल माहुरे, राहुल पचारे आदी उपस्थित होते.

यवतमाळ प्रतिनिधी अक्रम दिवान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad