अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव यांचं उत्कृष्ट निकाल.
शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १७ जून २०२२ शुक्रवारला लागला असुन महागाव येथील अनुसूचित जाती मुलीची निवासी शासकीय शाळा महागाव येथील शाळेमधून, मधून एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण ३८ विद्यार्थि या परीक्षेला बसले होते. ३८ पैकी ४ विद्यार्थि चांगली टक्केवारी घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले
असून एकूण निकालाची टक्केवारी श्रेणीत १००% तर प्रथम श्रेणीत पायल भगत ९३% द्वितीय संजीवनी बलखंडे ९२% तृतीय तन्वी गडदे ९१% चतुर्थ स्वाती राठोड ९०% शालेय उपक्रम व योग्य नियोजन व सराव परीक्षा यासाठी महत्वाचे असून शाळेमधून 100% विद्यार्थी पास झाले असून . 34 विद्यार्थि सुद्धा चांगले टक्केवारीने उत्तीर्ण झालेले आहे अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव येथील शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला भोयर ,शिक्षक श्री साबळे सर, चौधरी मॅडम, धारे सर,
राहुत सर ,पोटे मॅडम , किनगावकर मॅडम, भगत मॅडम, रमेश पडघणे ,व शाळेतील सर्वत्र शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
चांगली टक्केवारी घेऊन परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे एकंदरीत विद्यार्थिनीचा यावर्षीही सुद्धा अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा महागाव शाळेचा निकाल 100% लावून आपली परंपरा कायम ठेवली आहे परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत च्या बोर्ड परीक्षा निकालात मुलीनेच बाजी मारली असून शाळेत प्राविण्य सहित उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे
उत्कृष्ट निकालाबाबत अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यावर महागाव तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव