महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय मधून प्रशांत पवार प्रथम
प्रतिनिधी निगंनुर. मैनोदिन सौदागर निगंनुर ता उमरखेड जि यवतमाळ
उमरखेड तालुक्यातिल अति दुर्गभ भाग म्हणून ओळखले जाणारे निगंनुर येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय मधील विद्यार्थानी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. कोरोना काळा नंतर शैक्षणिक वर्ष २१- २२ मध्ये बोर्डामार्फत दहावी
बोर्ड परीक्षा घेण्यात आली होती. त्याच परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून महर्षी दयानंद सरस्वती विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला तर प्रथम प्रशांत प्रदिप पवार ८९.४०% टक्के या विद्यार्थ्यांनी विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर द्वितीय क्रमांक क्रिश अमोल राठोड ८८.६०% आहे.
टक्के घेत मिळवीला तसेच तृतीय क्रमांक कुमारी सतिका राजुसिंग राठोड हिने मिळवीला आहे. महर्षी दयानंद सरस्वती विध्यालयातील विद्यार्थानी घवघवतीत यश मिळवून विध्यालयाची
१०० टक्के निकालाची चालत आलेली परंपरा कायम राखली. एकुण ५४ विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ५४ विध्यार्थी ऊतिर्ण झालेत पैकी ३२ विध्यार्थ्यांना प्रविण्य श्रेणी मिळाली आहे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कवाने यांनी विद्यार्थीचे अभिनंदन केले. तसेच शिक्षकवृंद जाधव सर दुधेवार सर कहुळकर सर तास्के सर ढाकरे सर देशमुख सर या सर्वांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. मख्याध्यापक व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या