Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दाखवले कीटकनाशके हाताळणीचे प्रात्यक्षिक


शेतकऱ्यांना कृषीदुतांनी दाखवले कीटकनाशके हाताळणीचे प्रात्यक्षिक

अमळनेर: 'ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी
औद्योगिक कार्यक्रम'अंतर्गत धुळे येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके हाताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

या वेळी कृषिदुत शिवअमृत माळी,श्रीधर पाटील,नवनाथ शिदवडकर, आश्विन ढेकळे,रितेश शिंदे यांनी पिंपळी(प्र.ज.)मधील शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके हाताळणीचे प्रात्यक्षिक करून त्यांना वेगवेगळ्या किडींचा, रोगांचा तसेच तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती दिली.
      या प्रात्यक्षिकाकरिता कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.चिंतामणी देवकर कार्यक्रम समन्वयक डॉ.जे.एच.गायकवाड , केंद्रप्रमुख डॉ.जे.एम.पाटील. वनस्पती किटकशास्त्र विभागाचे विशेषज्ञ डॉ.जी.बी. काबरे यांचे मार्गदर्शन लाभले तर या प्रात्यक्षिका वेळी गावचे सरपंच मा.श्री.प्रेमचंद चव्हाण व इतर शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad