महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी अंतर्गत कृषि महाविद्यालय धुळे येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी 'ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि ओद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम' अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील पिंपळी गावात दाखल झालेले आहेत, या कार्यक्रमा अंतर्गत विविध प्रकारच्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती कृषिदुत देणार आहेत. पिंपळी (ता. अमळनेर) येथे कृषि दुतांचे स्वागत, गावचे सरपंच मा. श्री. प्रेमचंद चव्हाण व इतर ग्रामस्थांनी केले.
या दरम्यान कृषिदुत प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन प्रथम सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्या, शेतकयांचे जीवनमान आणि गावातील सामाजिक, आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण, संबंधित गावातील पीक पद्धती, नैसर्गिक संसाधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच माती परिक्षण, पाणी व्यवस्थापन, पिकांवरील विविध कीड व रोगांचे व्यवस्थापन, हवामान सल्ला बाजारभाव व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे मा.सहयोगी अधिष्टाता डॉ चिंतामणी देवकर तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. जे. एच. गायकवाड, केंद्रप्रमुख डॉ जे.एम पाटील व विषयतज्ञ डॉ. व्ही. एस. गिरासे, डॉ. जी. बी काबरे, डॉ. आर. जे देसले, डॉ. पी. पी. पवार, डॉ. व्ही. पी. भालेराव, डॉ. एस. पी. निकम, डॉ.पी. बी देवरे, डॉ. एस. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी कृषिदुत रितेश शिंदे आश्विन ढेकळे, नवनाथ शिदवडकर, शिवअमृत माळी व श्रीधर पाटील हे विद्यार्थी कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत राहतील.