शिंदे सरकार राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देणार
अयोध्येत प्रभु श्रीरामांचा जन्म झालेल्या ठिकाणी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे.
यानिमित्ताने देशभरात दिवाळी साजरी करण्याची तयारी हिंदु समाजाने केली आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिवाळीप्रमाणेच सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला.
त्यानुसार शिंदे सरकार 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर तेल देणार आहे.