तर अजित पवार मुख्यमंत्री होणार?, चर्चा सुरु
महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. हा निकाल शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विरोधात गेल्यास राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता सोशल मिडियावर व्यक्त केली जात आहे.
विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरल्यास एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा अर्थ असा आहे की विधीमंडळ पक्षाला नवा नेता निवडून सरकार स्थापनेसाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील.