Type Here to Get Search Results !

75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा/ गुणवत्तांचा सत्कार


75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा/ गुणवत्तांचा सत्कार. मा.सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष असलेल्या आंबेगाव वसाहत मधील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष 2023/ 24 मध्ये विविध स्पर्धा परीक्षा ,क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला.


 याप्रसंगी प्रथम मंगलमय वातावरणात प्रभात फेरी काढून सर्वप्रथम ग्रामपंचायत आंबेगाव वसाहत , जि प प्राथमीक शाळा, अंगणवाडी येथील ध्वजवंदन करण्यात आले तदनंतर यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील ध्वजाचे ध्वजवंदन करण्यात आले यावेळी झालेल्या छोट्याशा सभेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, टाकाऊतून टिकाऊ, राखी बनविणे ,रंगभरण स्पर्धा, गणित प्रज्ञाशोध परीक्षा, सायन्स, गणित, इंग्लिश ओलंपियाड स्पर्धा यामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला याप्रसंगी मा. श्री प्रकाश रावजी घोलप (मा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर) गावच्या प्रथम नागरिक सौ प्रमिला घोलप सौ.प्रवीण पानसरे उपसरपंच सौ.पूनम घोलप श्री. मिलिंद भांगरे सौ.कमल काठे (सदस्य) श्री.खंडू खंडागळे श्री.राजू पानसरे श्री.निलेश घोलप (मा. सरपंच) पालक सौ.नीलम भवारी श्री.पुंडलिक सुपे श्री.पांडुरंग धोत्रे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री. संजय वळसे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सौ. माणिक हुले, सौ. वैशाली काळे, सौ वंदना मंडलिक, सौ. लक्ष्मी वाघ, श्री वैभव गायकवाड, सौ. गौरी विसावे, श्रीम. राधिका शेटे तसेच जि प शाळेतील शिक्षक सौ. कोकणे, सौ. मिडगे, सौ. रायबोले, श्री. डोके, सौ डोके तसेच श्री. पिंगळे संतोष श्री. सुभाष साबळे, श्री. गुलाब बांगर, श्री. लक्ष्मण फलके इत्यादींचे सहकार्य लाभले सरते शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अविनाश ठाकूर सर यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रतिनिधी आकाश भालेराव
घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad