Type Here to Get Search Results !

शुरवीर संभाजी करवर यांच्या जयंती निमीत्ताने जांबुड येथील कुस्ती मैदानात 51000 हजार रूपये ची कुस्ती


शुरवीर संभाजी करवर यांच्या जयंती निमीत्ताने जांबुड येथील कुस्ती मैदानात 51000 हजार रूपये ची कुस्ती :भिमराव भुसनर पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक सरदार शुरवीर संभाजी करवर यांच्या जयंती निमीत्ताने मौजे जांबुड येथे 14 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता निकाली कुस्ती मैदान सर्व ग्रामस्थ व मान्यवर मंडळी च्या उपस्थित पार
पडले.
सदर कुस्ती मैदानात जांबुड गावचे जेष्ठ नेते नारायण पाटील व हटकर समाज महासंघाचे मार्गदर्शक ह.भ.प. जांलिधर चौगुले महाराज महिमकर, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा उद्योजक मा पैलवान विजय दादा भुसनर यांच्या हस्ते शिवाजी महाराज व संभाजी करवर यांच्या प्रतिमेची पुजा करून तसेच मैदानात हनुमान प्रतिमेचे पूजन करून कुस्त्या सुरू केल्या.100 रूपये ते 5000 रूपये पर्यंतच्या कुस्त्या मा. चेअरमन मा.अंबादास केचे व प्रगतशिल बागायदार अरूण देशमुख बोंडले यांनी नेमल्या.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे हटकर समाज जेष्ठ नेते पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा.सभापती नेते दाजी पाटील साहेब उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे चे चुलते सराटीचे मा.सरपंच रमेश बापु कोकाटे, अकलूज बाजार समिती चे संचालक पैलवान सुधीर सुरवसे मा.निवृत्ती नलवडे, जांबुड ग्रामपंचायत सदस्य मा.शिवाजी केचे मा.मुरलीधर कचरे, सोलापुर केसरी पैलवान किरण कदम, शिवसेना नेते प्रकाश बंबगर मा.विलास केचे,पैलवान उमाजी शिरतोडे,मा.अर्जुन पवार, पैलवान संतोष आप्पा कदम,शिवसेना नेते मा.विरेंद्र वाघमारे, राष्ट्रवादी काॅग्रेस चे नेते युवा उद्योजक मा सतिश करवर करोळे मा.चेअरमन राणु पाटील आव्हे मा.राजाभाऊ गायकवाड, युवा नेते राहुल ढेरे पाटील,माळीनगर कारखानाचे चीफ केमिस्ट मा.संतोष पांढरे साहेब मा.गजेंद्र म्हसवडे साहेब मा.हरिदास पाटील, नितीन वाघमारे,अरूण धुमाळ,माणिक व्हरगळ,मा.शशिकांत पाटील मा.सरपंच खळवे दिनकर केचे, शिवाजी नाईकनवरे,धनाजी देशमुख,भगवान पाटील, भगवान भुसनर, किसन मगर पत्रकार विनोद धुमाळ, खळवे मा.सरपंच मा.निवृत्ती बंडगर, संपतराव पाटील,नंदु गायकवाड आलेगांव पैलवान सचिन लोखंडे विठ्ठलवाडी पैलवान दादा खटके शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरहरी कचरे विठ्ठल भोसले,सतीश पवार, उपस्थित होते. यावेळी मैदानात पंच म्हणून अनिल फरतडे ज्ञानेश्वर नलवडे विनोद केचे दिलीप बेलदर सावकार केचे,मंच्छिद्र व्हरगळ, दशरथ भोसले, दादा भुसनर ,सोमनाथ चव्हाण ,बजरंग भुसनर, मारूती कोळी,यांनी जबाबदारी पार पाडली. 
 पांडुरंग आखाड्याचे प्रशिकक हनुमंत भुसनर वस्ताद समाधान अभंगराव पंढरपूर,महादेव ठवरे खुडुस अंकुश जाधव करकंब, लोखंडे वस्ताद खुडुस,चंद्रकांत सत्रे नांदोरे,आप्पा वाघमोडे,25/4 तांबवे पाटी शेखर शेवते अकलूज,पोपट मदने बंडगरवाडी,सचिन चव्हाण,तानाजी माने वेळापुर,संदीप कानगुडे नेवरे,करांडे वस्ताद पिलीव,शहाजी शेळके तांदुळवाडी,सोमनाथ मंडले कोंडारपट्टा इत्यादी पैलवानांना घेऊन आले होते.
मैदान यशस्वी करण्यासाठी तुकाराम हांडे सतीश भोसले राहुल केचे,सतिश भुसनर, भाऊसाहेब भोसले, विकास पवार महावीर माने प्रदीप नाईकनवरे अरूण देशमुख यांनी परिश्रम घेतले
कुस्ती मैदान निवेदक मुलुख मैदानी तोफ पैलवान धनाजी मदने पंढरपूर यांनी छान काॅमेट्री केली कुस्ती मैदानाचे आयोजन पैलवान भिमराव भुसनर पाटील संस्थापक अध्यक्ष हटकर समाज महासंघ व ग्रामस्थ जांबुड यांच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad