Type Here to Get Search Results !

भातकुली | वाळू माफियांसाठी तहसीलदार बनले सिंघम ,वाळू माफियांना लावला लगाम



अवैध माफियांसाठी भातकुलीचे तहसीलदार बनले सिंघम ,वाळू माफियांना लावला लगाम

थंडीचे दिवस आले की सातच्या आत घरात असा नियम प्रत्येकाचा असतो.

पण थंडी असो की पाऊस कर्तव्य सर्वात पहिले हे दिसून आले काल झालेल्या प्रसंगावरून .

सूत्रांच्या माहितीनुसार 

28- 12- 2023 रोजी भातकुली चे धडाकेबाज तहसीलदार अजित कुमार येळे यांच्या निर्देशानुसार

पूर्णा नगर मंडळ पथक हे रात्री 12 ते 2 या वेळेत कर्तव्यावर असताना गोपनीय माहिती मिळाली होती की MH32- P- 1952 क्रमांकाचा ट्रॅक्टर हा अवैधरित्या रेती घेऊन पूर्णा नगर ते टाकरखेडा या रोड न जाणार आहे अशी पक्की माहिती सूत्रांवरून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे टाकरखेडा शंभू रोडवरील पावर हाऊस जवळ सापळा रचण्यात आला होता.




ट्रॅक्टर जवळ येत असतानाच पथकाने ट्रॅक्टर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर चालक पथकाला न जुमानता कृष्णापुर रस्त्याने ट्रॅक्टर समोर घेऊन गेला आणि ट्रॅक्टर आणि ट्रॉली तिथे सोडून ड्रायव्हर पळून गेला. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याचा पाठलाग केला आणि त्या धावपळीत चालक मात्र पळून गेला. 

त्यानंतर महसूल पथकाने टाकरखेडा शंभू मधील ड्रायव्हर बोलावून आसेगाव पोलीस स्टेशन येथे तो ट्रॅक्टर आणून जमा केला त्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक बऱ्हास रेती सुद्धा आढळून आली.

ही सर्व कारवाई तहसीलदार अजित कुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा नगर मंडळ पथकाने केली असून कारवाई करत असताना मंडळ अधिकारी गौरव सुरपाटने,

पूर्णानगर चे तलाठी वाघ , रामा चे तलाठी दहाट , साउर चे तलाठी खानापूरकर , टाकरखेडा शंभू चे तलाठी बेले तसेच टाकरखेडा आणि रामा या दोन्ही गावचे कोतवाल आणि पोलीस पाटील सुद्धा हजर होते.

या झालेल्या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक वर्षानंतर भातकुली तालुक्याला एक धडाकेबाज , कर्तव्यनिष्ठ ,आणि इमानदार अधिकारी भेटला अशी चर्चा तालुक्यामध्ये सुरू झाल्याचे समजते.

बातमी लिहेपर्यंत आसेगाव पोलीस स्टेशन येथे कारवाई सुरू करण्यात आली होती.

भातकुली प्रतिनिधी वैभव भुजाडे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad