Type Here to Get Search Results !

राळेगाव | साठवून ठेवलेली वाळू चोरून नेणारे पोलिसाच्या ताब्यात



सभागृह बांधकामासाठी साठवून असलेल्या वाळू चोरून नेणारे राळेगाव पोलिसाच्या ताब्यात


 राळेगाव येथील गांधी लेआऊट येथील दि.22/12/2023 रोजी राळेगाव येथे फिर्यादी नाव संजय मांचावार रा. कोपरी यांनी पोस्टे ला जबानी रिपोर्ट दिला की गांधी लेआऊट मध्ये गुघाने infrastucture प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे श्री संत तुकाराम महाराज सभागृहाचे बांधकाम सुरू असून त्या कामासाठी रेती साठवलेली होती त्या साठवलेली रेती मधून 10 ते 12 ब्रास रेती कीं.40,000 रु. ची दी.20/12/2023 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अद्यन्यात चोरट्याने चोरून नेली बाबत पोस्टेला अप क्रमांक 764/23 कलम 379 भा. द वी चा नोंद केला

     सदर गुन्ह्याचे तपासात गोपनीय बातमीदार लावून दोन आरोपी 1)निखिल विनोद पावडे रा. राळेगाव,2)श्रीकांत परसराम थुटूरकर रा. रावेरी यास अटक करून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली रेती 10 ब्रास किंमत अंदाजे 40,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेले ट्रक्टर ट्रॉली किमंत अंदाजे 5,00,000 रुपये असा एकूण 5,40,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असून आरोपींचा शोध घेण्यात येत असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.


सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड सा., मा.अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप सा., मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर वेंजने सा पांढरकवडा,पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव पो स्टे राळेगाव यांचे मार्गदर्शनात पो. उप.नी. निलेश गायकवाड, पोहेका गोपाल वास्टर, नापोका सुरज चिवाने, पोका प्रशिक यांनी केली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.


प्रतिनिधी संजय कारवटकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad