Type Here to Get Search Results !

दिवा - सी एस एम टी लोकल सुरू करण्यासाठी संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या स्वाक्षरी मोहिमेस रेल्वे प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद



दिवा - सी एस एम टी लोकल सुरू करण्यासाठी संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या स्वाक्षरी मोहिमेस रेल्वे प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद


डोंबिवली(भानुदास गायकवाड)


                  संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष श्री विजय भोईर यांनी वेळोवेळी रेल्वेच्या समस्यांसाठी आवाज उठवला आहे. दिव्याची वाढती लोकसंख्या, त्यानुसार दररोज करणारे लाखो प्रवासी यातून रेल्वेला भरपूर उत्पन्न मिळत असते परंतु त्या प्रमाणात रेल्वे सुविधा पुरवताना दिसत नाही. आज इतकी प्रचंड गर्दी सकाळच्या वेळी असते की, लोकांना चढायला मिळत नाही.




कित्येक प्रवासी डोंबिवली कल्याणच्या दिशेने उलट प्रवास करून csmt लोकल पकडतात. कितीतरी वेळा ट्रेन पकडताना महिला प्रवासी चालू गाडीतून पडल्या आहेत, बरेच वेळेस पुरुष प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत. पण तरीही रेल्वे विविध कारणे देऊन दिवा लोकल सुरू करत नाही. पूर्वी सांगितले जात असे की दिव्याला होम प्लॅटफॉर्म नाही म्हणून सध्या ही गोष्ट अशक्य आहे. आता तर होम प्लॅटफॉर्म काम सुरू आहे तेही अत्यंत संथ गतीने अगदी निकृष्ट दर्जाचे तरी देखील रेल्वे प्रशासन दिवा लोकल चालू करण्याबाबत उदासीन दिसत आहे.




प्रवासी इतके त्रस्त आहेत की ते वारंवार आमच्याकडे येऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विनंती करत असे. या लोकांच्या मागणीला न्याय देण्यासाठी संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने श्री विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक ,२९/११/२३ रोजी स्वाक्षरी मोहीम राबवली आणि यात पहिल्याच दिवशी जवळजवळ १५००० प्रवाशांनी सह्या करून रेलवेविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.




तसेच उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे श्री नंदकुमार देशमुख, लता अरगडे मॅडम, तन्मय नवरे स्वतः उपस्थित राहून आम्हीही तुमच्या या मागणीसाठी ठामपणे तुमच्या पाठीशी राहु असा शब्द दिला. तसेच या मोहिमेत लोकांना प्रवृत्त करण्यासाठी माजी नगरसेवक श्री अशोक पाटील, दिवा भाजप मंडळ अध्यक्ष श्री सचिन भोईर, विनोद भगत,रोशन भगत, सपना भगत, मंडळअध्यक्षा दिवा भाजप महिला, समीर चव्हाण,प्रफुल साळवी,युवराज यादव,राजेंद्र आंब्रे,गणेश गुप्ता,विद्यासागर दुबे, पंकजसिंग,गौरीशंकर पटवा, अवधराज राजभर,जीलाजित तिवारी, रमेशचंद्र यादव,अनिल साह, सूरज पानसरे, सरला गायकर,नीलम मिश्रा,निशा सिंग, संध्या कुशवाह,सुनीता प्रजापती,अनिता यादव, रंभा राजभर इत्यादी सर्व कार्यकर्ते जातीने हजर होते.




श्री. विजय भोईर यांनी लोकांना यावेळी विश्वास दिला की या मोहिमेतून जर हा प्रश्न नाही सुटला आणि तुमची साथ असेल तर आपण वेळ पडल्यास ट्रॅक वर उतरून हा प्रश्न मार्गी लावू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies