Type Here to Get Search Results !

खेड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गॅस सिलेंडर चोरी करणारे आरोपी गजाआड



खेड पोलीस स्टेशात गु.र.नं.१०२०/२०२३ भा.व. वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे दि.२८/११/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील सो तसेच मा. पोलीस निरीक्षक राजकुमार वोट सो। यांचे मार्गदर्शनाखाली खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अबाले, पो. हवा घोलप, पो, कॉ शिंगाडे, होमगार्ड सांडभोर, होमगार्ड वारे यांनी दाखल असलेल्या गुन्हयाचा अधिक तपास केला असता इसमनामे आकाश सुरेश कर्वे रा. वास गुंजवठा व त्यांचा साथीदार रविंद्र प्रमोद नाईकरे यानी गेले १ महीन्यापासुन राजगुरुनगर शहरात होम डिलव्हरी करणारे डिलव्हरी बॉय यांचे गॅस सिलेंडर टाक्या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचे कामी आरोपींना अटक करण्यात आले असुन त्यावेकडून ३२,०००/- रूपये किंमतीच्या एच. पी. कंपनीच्या एकुण १० टाक्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
तसेच खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. १०२१/२०२१ भा.दं. वि. कलम ४०८ प्रमाणे दि २९/११/२०२३ रोजी गुरहा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील सो। तसेच मा. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे सो। यांचे मार्गदर्शनाखाली खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खबाले, पो. हवा, घोलप, पो. कॉ. शिंगाडे, होमगार्ड सांडभोर, होमगार्ड वारे यांनी दाखल असलेल्या गुन्हयाचा अधिक तपास केला असता इसमनामे संदीप धोंडीभाउ भोकसे रा. राजेवाडी ता. खेड जि. पुणे हा स्वयंभु भारत गॅस एजन्सीमध्ये काम करत असताना त्यांन एजन्सी मालक यांना न सांगता एकूण ४१,६००/- रूपये किंमतीच्या भारत गॅस कंपनीच्या १३ सिलेंडर टाक्या अपहार केल्याची कबुली दिली असुन सदर गुन्हयाचे कामी आरोपीस अटक करण्यात आले असुन आरोपीने अपहार केलेल्या १३ गॅस सिलेंडर टाक्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
खेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad