मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळावे ही मनोज जरांगेंनी मागणी लावून धरली आहे. या मागणीला छगन भुजबळांनी कडाडून विरोध केला आहे.
अजित पवारांनी मनोज जरांगेंचे कान टोचले आहेत. जातीचा अभिमान जपा पण इतर जातींसंदर्भात मनात द्वेष ठेऊ नका. एका समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
मराठा समाजाला आरक्षण देताना इम्पेरियल डाटा महत्त्वाचा आहे. त्याशिवाय आरक्षण टिकणार नाही, असे अजित पवार म्हणाले.