सुप्रिया सुळेंनी भाजपवर साधला निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी भाजप "भ्रष्ट जुमला पक्ष" असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांचा "अपमान" केल्याचा आणि अजित पवार गटाला 'फसवण्याचा' आरोप सुळेंनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून सत्ताधारी पक्षाच्या जागेवर मलिक यांच्या नियुक्तीला विरोध केला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या की, ते पत्र मी वाचले असून नवाब मलिक यांचा ज्या प्रकारे अपमान करण्यात आला आहे, ते चुकीचे आहे.