जिल्हा परिषद शाळा चौक येथे संविधान गुणगौरव परीक्षा कार्यक्रम संपन्न
91 INDIA NEWS NETWORKरविवार, डिसेंबर ०३, २०२३
0
जव्हार : सुनिल जाबर
संविधान प्रचार प्रसार मंच पालघरच्या वतीने भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करणे, शालेय जीवनापासूनच संविधानाची मूलभूत ओळख होऊन त्याद्वारे आदर्श नागरिक घडविणे व भारताची अखंडता जोपासणे या उदात्त हेतुने संविधान गुणगौरव परीक्षा २०२३ चे आयोजन जिल्हा परिषद शाळा चौक येथे दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी केंद्रसमन्वयक दिनेश पडवळ व चौक केंद्राचे केंद्रप्रमुख रवी बुधर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन परीक्षेचे उदघाट्न करण्यात आले. सदर परीक्षा राज्यस्तरीय असून चौक शाळेतील ७० विदयार्थी परीक्षेला बसले असून ५० प्रश्नांची १०० गुणांसाठी लेखी स्वरूपात होती . परिक्षेचे प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक गणपत गावंढा यांनी केले . अध्यक्ष रविंद्र वैजल यांनी संविधानाची मूलभूत ओळख करून देत मार्गदर्शन केले. या प्रसंगी सरपंच अंजली गोंड , माजी पं.स सदस्य मनू गावंढा, विस्तार अधिकारी ( शिक्षण) सुरेश भोये , केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर खाले यानी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकेचे प्रकट वाचन विद्यार्थिनी पुजा काटेला हिने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक पांडुरंग गावित यांनी केले. सदर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी चौक शाळेचे शिक्षक मोतीराम काटेला, राजेश भोये , राहुल खरपडे व महेंद्रा धिंडा यांनी मोलाचे योगदान दिले.