Type Here to Get Search Results !

घोडेगाव पोलीस स्टेशनने अवैध दारूच्या धंदयावर केलेली कारवाई



घोडेगाव पोलीस स्टेशनने अवैध दारूच्या धंदयावर केलेली कारवाई


दिनांक १६/१२/२०२३ रोजी गोपनीय बातमी मिळाली की, मौजे शिनोली गावचे हददीत बिगर परवाना दारूची विक्री चालु आहे. सदर बातमीचे अनुषंगाने दिनांक. १६/१२/२०२३ रोजी सायं. १९.४५ वा.चे सुमारास घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफनी मौजे शिनोली गावचे हददीत दत्त मंदीरासमोर अनिल हिरोजी बो-हाडे वय ५६ वर्षे रा. शिनोली ता. आंबेगाव जि.पुणे हा इसम त्याचे राहते घराचे भिंतीचे आडोशाला त्याचे ओळखीचे लोकांना चोरून दारू विकी करत असताना दिसुन आल्याने सदर वेळी पोलीसांनी छापा कारवाई केली असता अनिल बो-हाडे हा त्याचे ताब्यात १) ९०० रूपये किमंतीच्या १८० मि.ली. मापाच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूच्या ०५ बाटल्या, २) १२८० रूपये किंमतीच्या १८० मि.ली. मापाच्या इम्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या विदेशी दारूच्या ०८ बाटल्या, ३) ८४० रूपये किंमतीच्या १८० मि.ली. मापाच्या डि.एस.पी. ब्लॅक कंपनीच्या विदेशी दारूच्या ०६ बाटल्या, ४) ३०८० रूपये किंमतीच्या १८० मि.ली. मापाच्या जी.एम. संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या ४४ बाटल्या, ५) १३६५ रूपये किंमतीच्या ९० मि.ली. मापाच्या जी.एम. संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या ३९ बाटल्या, असा एकुण ७४६५ रूपये किंमतीचा देशी विदेशी दारूचा मुददेमाल बिगर परवाना जवळ बाळगुन मिळुन आल्याने त्यास जागीच ताब्यात घेण्यात आले असुन सदर बाबत घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन यापुढे देखील अशाप्रकारचे अवैध धंदे आढळुन आल्यास घोडेगाव पोलीसांच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


सदरची कारवाई घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. किरण भालेकर यांचे मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस स्टेशनकडील डि.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. निखील मगदुम, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव ढेंगळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री भोर यांचे पथकाने केली.


प्रतिनिधी - आकाश भालेराव 

घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad