जव्हार :-सोमनाथ टोकरे.
दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी जव्हार तालुक्यातील जव्हार पासून १५ कि. मी. अंतरावर असणारे पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरवाडी येथे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी उपसभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य जव्हार चंद्रकांत रंधा, तसेच सरपंच संघटनेचे अध्यक्ष व झाप ग्रामपंचायत सरपंच एकनाथ दरोडा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.
माझे शिक्षण मी खूप गरीब परिस्थितीमध्ये पूर्ण करून जव्हार ते ठाण्याला पायी प्रवास करून पोलीस भरतीसाठी गेलो होतो . सर्वच फिजिकल मध्ये मी फिट असल्यामुळे धावणे मध्ये ,उंची मध्ये, छातीमध्ये मी फिट असल्यामुळे त्या भरतीमध्ये मी पास झालो आणि 1987 साली मी पोलीस म्हणून नियुक्ती झाली. माझी सर्विस एकूण 37 वर्ष मी पोलीस म्हणून सेवा केली. या ३७ वर्षांमध्ये अनेक पोलीस स्टेशनला मी प्रामाणिकपणे काम केले. म्हणून आदिवासी जव्हार. मोखाडा, विक्रमगड,तलासरी, डहाणू, वाडा, सर्व तालुक्यातील मुला मुलींनी चांगलं शिक्षण घेतले पाहिजे. पोलीस भरतीच्या स्पर्धा परीक्षेसाठी फिजिकल साठी प्रचंड कष्ट मेहनत जिद्द चिकाटी सातत्याने अभ्यास केला पाहिजे. तरच आपण पोलीस म्हणून नियुक्ती होईल. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच्या तरुणांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली पाहिजे. तसेच व्यसनापासून दूर राहिले पाहिजे तरच आपल्या गावाचे नाव तालुक्याचे नाव कुटुंबाचे नाव रोशन होईल. असे यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किसन सखाराम भोये यांनी बोलताना सांगितले.
तसेच कार्यक्रमात रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी उपसभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य चंद्रकांत रंधा, झाप ग्रामपंचायत सरपंच एकनाथ दरोडा, पाथर्डी ग्रामपंचायत सरपंच सुनील वातास, तंटामुक्त अध्यक्ष गोतारने, मराठी अभिनेता यशवंत तेलम, विनोद बुधर, रामभाऊ भोंडवा क्रिकेट समालोचक किरण खांनझोडे, संतोष सोळे, रमेश भोये, देवराम भोंडवा,दिलीप वाघ इतर ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी गावातील जेष्ठ मंडळी महिला मंडळ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.