Type Here to Get Search Results !

जगदंबा माऊली महोत्सव सावंगी येथे उत्साहात साजरा



चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे


घुग्घुस येथून जवळच असलेल्या सावंगी (जुनी) ता. वणी येथे जगदंबा माऊली देवस्थान व ग्रामवासींयातर्फे शुक्रवार २४ नोव्हेंबर पासून जगदंबा माऊली ३ दिवसीय महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.




 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग प्रेसिंग वणी, दिनकर पावडे सदस्य इंदिरा गांधी सहकारी सुतगिरणी वणी, माजी आमदार वामनराव कासावार वणी विधानसभा, मुरलीधर पाटील बेरड, सरपंच शालू ठाकरे, उपसरपंच नानाभाऊ आत्राम, प्रवीण पिदूरकर, नाना ढवस, धनराज राजगडकर, भाऊराव पिदूरकर माजी सरपंच मंजुषा पिदूरकर पोलिस पाटील, संजय राठोड पोलिस निरीक्षक शिरपूर, विजय पिदूरकर माजी जि.प.सदस्य, उमा पिदूरकर माजी जि.प. सदस्य, परमपूज्य खेमराज पावडे महाराज कायर पिंपरी, विठ्ठल जुनघरी, दिनू हणमंते, अरुण पिदूरकर, संदीप जुनघरी, गणेश ठाकरे, हरी बेरड, पदावली भजन मंडळ लोणारा, चंद्रपूर, पुनवट, कुर्ली, नायगाव अशा १२ गावातील भजन मंडळ सहभागी होते. गावात सर्वत्र रांगोळी काढण्यात आली होती, फुलांचा वर्षाव करीत पाय धुवून अक्षदा लावून भजनकरी भाविक भक्तांनी पालखीची गावात मिरवणुक काढली.




सकाळी ६ वाजता ग्रामसफाई, महापूजा, भजन सकाळी ९ वाजता, ग्रामदिंडी ११ वाजता, महाप्रसाद दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तसेच गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री. दत्ताभाऊ राऊत वर्धा यांचा भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.चार ते पाच हजार लोक कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad