Type Here to Get Search Results !

करोळे | 26/11 शहीद दिन व भारतीय संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन



करोळे मुंबई येथील 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ व भारतीय संविधान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन




रक्तदान हे श्रेष्ठदान मानत करोळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 45 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले, या रक्तदान शिबिराचे आयोजन करोळे गावचे युवा नेतृत्व माननीय श्री सर्जेराव (आप्पा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व गुरुदत्त दूध संकलन केंद्र ,जय हनुमान ग्रुप व समस्त ग्रामस्थ करोळे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,




या रक्तदान शिबिरासाठी अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील या रक्तपेढीने रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले, या वेळी करोळे गावातील ग्रामस्थ यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले.

आपल्या रक्तदानाने एक बहुमोल मानवी जीव वाचण्याचे श्रेय आपणास मिळत आहे. आपल्यासारख्या राष्ट्रप्रेमी व स्वार्थत्यागी नागरिकांचा आम्हास अभिमान वाटतो. ही ज्योत अशीच प्रज्वलित ठेवा. आपण रक्तदान केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad