आंबेगाव वसाहत
दिनांक 25/11/2023
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे रांगोळी स्पर्धेतून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना स्मृतीदिनानिमित्त मानवंदना देण्यात आली.
रांगोळी स्पर्धेत विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 60 प्रबोधनपर रांगोळ्या काढल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली .रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूणहत्या, बेटी बचाव बेटी पढाव ,जल हेच जीवन , पर्यावरण प्रदूषण, समर्थ भारत, चांद्रयान मोहिम ,शेतकरी आत्महत्या, स्वच्छ भारत सुंदर भारत , वृक्षसंवर्धन , पारंपरिक सण या विषयांवर आधारित प्रबोधनपर रांगोळ्यांचे रेखाटन केले. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मा. सभापती प्रकाशराव घोलप सरपंच प्रमिलाताई घोलप उपसरपंच परवीन पानसरे ग्रामपंचायत सदस्य विजय घोलप , मिलिंद भांगरे , राजुभाई पानसरे ,खंडु खंडागळे, हेमंत काळे यांच्या हस्ते करण्यात आले.रांगोळी स्पर्धेचे परिक्षण मनिषा आढळराव यांनी केले.
रांगोळी स्पर्धेत लहान गट प्रथम क्रमांक जान्हवी उमेश झोडगे,द्वितीय क्रमांक समीक्षा संदीप दगडे,तृतीय क्रमांक स्वराज सचिन जगदाळे, उत्तेजनार्थ सोहम सोपान भवारी मोठ्या गटात प्रथम क्रमांक कल्याणी किशोर डोंगरे द्वितीय क्रमांक आदिती हर्षल घोडेकर तृतीय क्रमांक आयुष अजित डोके उत्तेजनार्थ ईश्वरी विठ्ठल मोरे यांनी पटकावले.
रांगोळी प्रदर्शनाचे नियोजन माणिक हुले, वैशाली काळे,संजय वळसे, लक्ष्मी वाघ, वैभव गायकवाड, गौरी विसावे, राधिका शेटे, संतोष पिंगळे, लक्ष्मण फलके, सुभाष साबळे, गुलाब बांगर यांनी केले. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी प्रदर्षणास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रतिनिधि - आकाश भालेराव घोड़ेगांव