Type Here to Get Search Results !

राजगुरूनगर 1 तारखेला कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबीर



राजगुरूनगर ला 1तारखेला कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबीर


राजगुरूनगर ला जैन धर्मार्थ दवाखाना व कॉकलिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच यांच्या संयक्त विद्यमाने 1 डिसेंबर ला कर्नबधिर रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले गेले आहे.सदर शिबीर हे 0 ते 6 या वयातील बालकांसाठी उपलब्ध असून ह्या शिबिरात ज्यांना गरज भासेल त्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. जैन धर्मार्थ दवाखाना हे भारतमाता प्रमोदसुधाजी म.सा.ट्रस्ट तर्फे चालवले जाते..ह्या हॉस्पिटल मार्फत दर महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून समंधित रुग्णांना मदत सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जातो.


ह्या आरोग्य शिबाराची माहिती देताना पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द कान नाक घसा तज्ञ् डॉक्टर वाचासुंदर यांनी माहिती देताना सांगितले की समाजातील कर्नबधिर रुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही जैन धर्मार्थ दवाखाना व कॉकलीया पुणे फॉर हीअरिंग अँड स्पीच या संस्थे मार्फत आम्ही दिनांक 1 डीसेम्बर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले असून ह्या शिबिरात गरजवंतांना कॉकलियर ट्रान्सप्लांट मोफत शस्त्रक्रिया सुद्धा केली जाणार आहे.ह्या शास्त्रक्रियेसाठी कमितकमी 6 ते 7 लाख रुपये खर्च असतो . प्रवर्तींनी प.पू.प्रमोदसुधाजी म.सा.ट्रस्ट व कॉकलीया पुणे फॉर हीअरिंग या दोन्ही संस्थानमार्फत चिंचवड येथील मोरया हॉस्पिटल येथे हिशास्त्रक्रिया केली जाणार आहे....जैन धर्मार्थ दवाखान्या मार्फत सुमित शहा व कॉकलिया पूणे फॉर हीअरिंग तर्फे स्वरनाद च्या स्वाती मोरडे ह्या ह्या शिबिराचे कामकाज पाहणार आहेत से सुद्धा वाचसुंदर यांनी सांगितले.


प्रतिनिधि - आकाश भालेराव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad