मनोज जरांगेंची जीभ घसरली, भुजबळांबाबत वापरले अपशब्द
ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना मनोज जरांगे यांनी अपशब्द वापरले आहेत. जरांगे म्हणाले की, "छगन भुजबळ पनवती असून उगाच शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. जो माणूस पायदळी कायदा तुडवतो. जो शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो त्याने शेतात जायला नको पाहिजे. उगाच त्या जमीनवाल्या शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. हा माणूस पनवती असल्यासारखा आहे".दरम्यान, राज्यात आधीच ओबीसी - मराठा वाद असताना जरांगेंनी असे वक्तव्य करुन वाद आणखी पेटवू नये, अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.