Type Here to Get Search Results !

आज कोरपणा तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा



कोरपणा मनोज गोरे


 कोरपणा या तालुक्याच्या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाचा जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा जनक्रोश मोर्चा राजुरा विधानसभेचे आमदार तथा चंद्रपूर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कोरपणा बस स्थानक चौका पासून तहसील कार्यालयाच्या मुख्य मार्गाने जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालय येथे धडकला




यामध्ये शेतकरी शेतमजूर युवक महिला तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शविली सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच मागील दहा वर्षांपासून हुकूमशाही सरकारने जनतेची फसवणूक करण्याचे काम सुरू केले आहे .




सर्व विभागात खाजगीकरण करून अनेक शासकीय संस्था विक्री काढलेल्या आहेत तसेच शेतीमालाला हमीभाव नाहीत त्यामुळे या आंधळ्या बहिऱ्या सरकारला जागे करण्याकरिता हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला असे मत राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले




यावेळी अनेक मागण्याचे निवेदन तहसीलदार मार्फत माननीय महा महिम राष्ट्रपती यांना देण्यात आले मागण्या ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण न देणे, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील जात निहाय जनगणना करणे, संविधानातील 340 कलमानुसार अंमलबजावणी करणे, ओबीसी मुलांचे 72 वस्तीगृह चालू करणे, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करणे, विद्यार्थी हितासाठी वीस पटसंख्या खालील शाळा बंद होऊ नयेत यासाठी समूह शाळा संकल्पना रद्द करणे ,आरसीसीपीएल कंपनी मुकुटबन यांनी परसोळा शस्त्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी थेट कंपनी मार्फत खरेदी करणे व रोजगार देणे, तसेच मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याबाबत, सोयाबीन पिकावर आलेल्या रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावे, शासनाने सीसीआय केंद्र कोरपणा तालुक्यात चालू करणे ,अतिवृष्टी व पूरबुडी ने शेतीचे व घरांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे प्रमाणे मदत मिळण्यात यावी, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये तात्काळ करण्यात याव्या, शेत जमिनीचे आदिवासी लोकांचे तात्काळ पट्टे मिळण्यात यावे, गॅस पेट्रोल डिझेल महागाई दर कमी करण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात यावे, दालमिया सिमेंट कंपनी नाराडा मध्ये सांगोला येथील शेतकऱ्यांच्या जमिनी थेट खरेदी करून एका सातबारा वर एक नोकरी देण्यात यावे, असे विविध मागण्या घेऊन हा जन आक्रोश मोर्चा कोरपणा तहसील कार्यालय इथे धडकला




तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष उत्तमरावजी पेचे , सीडीसीसी बँकेचे संचालक विजयराव बावणे ,संभाजी कोवे, श्याम भाऊ रणदिवे, गणेश गोडे आशिष देरकर सुरेश पाटील मालेकर, सितारामजी कोडापे आधी शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी समवेत निवेदन देण्यात आले.




मोर्चा शांततेत पार पडला यावेळी पोलीस बंदोबस्त हि तैनात होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies