Type Here to Get Search Results !

हातकणंगले | खासदार धैर्यशील माने हरवले ? मराठा समाजाकडून मोर्चा काढून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल




हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने हरवले ?

वडगांव पोलीस स्टेशन ला मराठा समाजाने मोर्चाने केली तक्रार.

मराठा समाजाचे गेले अनेक दिवस आदोलन सुरू आहे मनोज जरंगे पाटील उपोषणास बसले असून त्यांना अनेक गावागावात विविध प्रकारे तसेच मोर्चाने पाठींबा मिळत आहे. यातच आमदार खासदारांचे राजीनामा नाट्य ही दिसत आहे. तर पेठ वडगाव येथे साखळी उपोषण सुरू आहे. यातच आज गुरुवार वडगाव, टोप, मंगरायची वाडी, तसेच पेठ वडगाव पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने पेठ वडगाव पोलीस स्टेशन ला गेले अनेक दिवस मराठा समाजाचे आंदोलन सुरू असून मराठा समाजाच्या नावाने मते मागून खासदार झालेले खासदार झालेले धैर्यशील माने यांनी कोणताही आवाज लोकसभेत किंवा इतर कुठेही ठळक पणे उठवला नाही यामुळे आज पेठ वडगांव पोलीस स्टेशन ला मोठ्या मोर्चाने खासदार आमचे हरवले असे निवेदनाव्दारे तक्रार दिली.

कोल्हापूर. संतोष पाटील 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad