Type Here to Get Search Results !

लोकनियुक सरपंच कल्पेश राऊत यांचा कासाट वाडी ग्रामपंचायत मध्ये विकास कामाचा धडाका



जव्हार :-सोमनाथ टोकरे 


 जव्हार तालुक्यातील नामवंत बहुचर्चित असणारी कासटवाडी ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून दि.३ नोव्हेंबर २०२३ रोजी मौजे कासटवाडी ह्या गावात, " पाणी आडवा पाणी जिरवा " या संकल्पनेतून शेतकरी लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला याच्या फायदा शेतकऱ्यांना होणार असून वाहणारे पाणी अडवले जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला, उन्हाळ्यामध्ये भाजीपाला लागवड करण्यासाठी फळभाज्या लागवड. मोकाट जनावरांना पाणी पिण्यासाठी झाडे रोपे लागवड करण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे व यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण होईल यावेळी लाभार्थी शेतकरी, ग्राम सरपंच .कल्पेश विनायक राऊत, ग्रामविकास अधिकारी, ग्रापपंचायत सदस्य व पर्यवेक्षक अहिरे सर, दाभेराव सर कृषि सहाय्यक नितीन पाटील, सुमित महाले, विकास भदाणे, सुनील, महाले, विनायक जाधव, संजय डोके, भरत कोरडे, राम पाटोळे उपस्थित होते या दरम्यान शेतकऱ्यांना हरभरा बियाणाचे सुद्धा वाटप करण्यात आले.

*कोट*..........

जव्हार तालुक्यातील जव्हार शहरा पासून काही अंतरावर आमची ग्रुप ग्रामपंचायत कासरवाडी आहे. ग्रामपंचायत मधील शेतकऱ्यांना त्याचा भाजीपाला लागवड करण्यासाठी फायदा होईल. तसेच त्यांचे स्थलांतर मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये दुबार शेती केली तर त्यांच्या त्याला फायदा होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad