शरद पवार गट अजित पवार गटाला घेरण्याच्या तयारीत
शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचा मागणीने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींची भेट घेतली आहे. शरद पवार गटाच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. दरम्यान, शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांच्या अप्रत्यक्ष सहमतीनेच पाऊले उचलत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये आहे.