जव्हार :-सोमनाथ टोकरे
दि. २१: भिवंडी येथील शांतीनगर परिसरात राहणारी झरीना शेख वय २६ वर्ष ही मनोरुग्ण महिला आहे. मनोरुग्ण महिलेला नेहमीच अनैतिक प्रकारांना तोंड द्यावे लागते. या महिलेला मिशन फौडेशनने दिला कायमस्वरूपी निवारा.
झरीनाची आई वयोवृद्ध आहे. आई आणि झरीना ह्या दोघीच भिवंडीच्या झोपडपट्टीत राहत होत्या,ठाणे येथील मनोरुग्णालयात झरीनावर उपचार सुरु होते.पण काही दिवस मनोरुग्णालयात ठेवल्यानंतर डॉक्टरांनी तील घरी पाठवले. मात्र झरीनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही.
झरीना घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून तिच्या आईने तिला साखळ दांडाणे बांधून ठेवले होते. साखळी सोडली की झरीना रस्त्यावर जात असे व अंगावरचे सगळे कपडे फाडून टाकत असे. मनोरुग्ण असल्यामुळे ती काहीही करत असे. ह्या सगळ्या त्रासाला तिची वयोवृद्ध आई कंटाळली होती. या बाबत मिशन माणुसकी फाऊंडेशनचे मिलिंद कांबळे यांना समजताच कांबळे यांनी मराठा लाईफ फाउंडेशनचे संस्थापक किसन लोखंडे यांच्या कानावर झरीनाची कहानी घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ लोखंडे यांनी ममोरुग्ण महिलेला आयुष्यभर मोफत संभाळण्याची जबाबदारी घेतली. व तिच्या मानसिक आजारावर योग्य तो उपचार करू असे आश्वासन मिशन कांबळे यांना दिले.
आता झरीनाला रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथाचा पोशिंदा किसन लोखंडे यांच्या मराठा लाईफ फाउंडेशन मध्ये दाखल केले आहे.