मनोज जरांगेंची ओबीसी नेत्यांना धमकी; 'शांतीचा मार्ग सोडावा लागेल'
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे आपल्या प्रत्येक सभेतून ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. येवल्यात लावलेले गावबंदीचे होर्डिंग फाडण्यात आल्याचे आरोप करत जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले. तसेच, छगन भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम असल्याची धमकी देखील जरांगेंनी दिली आहे. आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, नंतर आमच्या नावाने खडे फोडू नका, असे देखील ते म्हणाले.