टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने केवळ बॅटनेच नव्हे तर चेंडूनेही आपले गोलंदाजीचे कौशल्य दाखवले. बंगळुरू येथे झालेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करणाऱ्या विराटने डच कर्णधार स्कॉट एडवर्ड्सची विकेट घेतली. विराटने तब्बल नऊ वर्षांनी विकेट घेतली.विराटची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ही विकेट घेतल्यावर आनंद साजरा केला. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारताने ही लढत 160 धावांनी जिंकली. सेमी फायनलला 15 नोव्हेंबरला वानखेडेवर दक्षिण आफ्रिकेसोबत गाठ पडणार आहे.