Type Here to Get Search Results !

सह्याद्री परिसर शेतकरी संघाची वार्षिक सभा वसंतराव नाईक सभागृह ठाणे येथे संपन्न


 

शेतकरी संघाच्या उपाध्यक्षपदी डोंगर न्हावे गावचे चंद्रकांत दादा शेळके यांची निवड  

 

          तर शेतकऱ्यांच्या विविध महत्त्वपूर्ण व 35 सेक्शन बाधित समस्येवर महत्त्वपूर्ण   चर्चा

 

मुरबाड दिनांक 31  प्रतिनिधी लक्ष्मण पवार 


 30/10/2023 रोजी सह्याद्री परिसर शेतकरी संघाची सर्वसाधारण सभा  सन्मानीय, किशोरजी ठाकरे   सेवा निवृत्त  वनसंरक्षक यांचे अध्यक्षेतेखाली वसंतराव नाईक सभागृह ठाणे पश्चिम येथे पार पडली सदर सभेत मोठ्या संख्येत  शेतकरी बांधवासह सेवानिवृत्त वनाधीकारी उपस्थित होते. शेतक-यांचे महत्वाचे प्रश्न सेक्शन  35 बाधित शेतकरी,  वन्य जिव मानव संघर्ष,  वन्य जिव मनुष्य व पाळीव प्राणी हाणी नुकसानी, वन्य जिव पीक नुकसानभरपाई,  सन 1960 पासुन प्रकल्प ग्रस्त बाधित शेतकरी समस्या,  पीक विमा,आंबा उत्पादक शेतक-यांना पीक विम्याचे रक्कम अध्याप मीलालेली नाही, पीक कर्ज शेतकरी 50000/- सानुग्रह अनुदान एक वर्षापुर्वी जाहीर होऊन काही शेतक-यांना अध्याप मिलालेला नाही,  वन हक्क अधिकार,  पर्यावरण संवेदनशील क्षेत्र,  शेतकरी बचाव ईत्यादी विषयावर महत्व पुर्ण चर्चा होउन सह्याद्री परिसर शेतकरी संघाची पुढील रन निती ठरविण्यात आली. एडवहोकेट राहुलजी  ठाकरे यांनी कोरट केसेस बाबत सुतोवाच केले .  सेवानिवृत्त वनाधिकारी शासकीय सेवानिवृत्तीनंतर समाज कार्यात कार्यरत आहेत व सध्या महाराष्ट्र वनसेवानिवृत्त (पेंशनर ) असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असलेले सन्मानीय.  चंद्रकांत शेळकेसाहेब यांची  सह्याद्री परिसर शेतकरी संघाचे उपाध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.... पुढे संघाची धेय धोरणे ,  निर्धार सभेचे नियोजन सन्मानीय. गणपतजी विषेसाहेब शहापुर येथे करणार असल्याचे घोषित करून सभा संपन्न झाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad